Israel-Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 14 पॅलेस्टिनी ठार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती
इस्रायलने गाझामध्ये पुन्हा हल्ला केला. ज्यात 14 लोक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसरा मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
Israel-Hamas War: पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिका-यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझावर पुन्हा दोन हल्ले (Gaza Attacks) केले. ज्यात 14 लोक ठार झाल्याची माहिती आहे. पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. खान युनिस शहराच्या पश्चिमेकडील मुवासी मानवतावादी झोनमधील एका कॅफेटेरियाला सोमवारी उशिरा झालेल्या एका हल्ल्यात दोन मुलांसह किमान 11 लोक ठार झाले आहेत. मंगळवारी पहाटे आणखी एक एयर स्ट्राइक झाली. ती नर्सिंग शिबिरातील एका इमारतीवर धडकली. ज्यामध्ये एका महिलेसह तीन लोक ठार झाले, अल-अवदा हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात अन्य 11 जण जखमी झाले. (हेही वाचा: Israel Attack on Syria: इस्रायलचा सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला; 7 ठार, 20 हून अधिक जखमी)
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 14 पॅलेस्टिनी ठार