Violence in Iran: पोलीस कोठडीतील महिलेच्या मृत्यूमुळे इराणमध्ये संतापाचा भडका; संतप्त आंदोलकांनी केली पोलीस स्टेशन आणि वाहनांची जाळपोळ (Watch Video)

तेहरानमधील मेहसा अमिनी या 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी ‘हिजाबच्या नियमांचे उल्लंघन’ केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

इराणमध्ये हिंसा (संग्रहित संपादित प्रतिमा)

इस्लामिक रिपब्लिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर तेहरान आणि इतर अनेक इराणी शहरांमध्ये परिस्थिती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या मृत्यूच्या सहाव्या दिवशी गुरुवारी आंदोलकांनी संतप्त होऊन शहरातील अनेक भागात पोलीस स्टेशन आणि वाहनांची जाळपोळ केली. असोसिएटेड प्रेसने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे, संतप्त निदर्शक आणि इराणी सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

तेहरानमधील मेहसा अमिनी या 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी ‘हिजाबच्या नियमांचे उल्लंघन’ केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. गेल्या आठवड्यात पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला. अमिनीच्या मृत्यूनंतर लोकांचा संताप उफाळून आला आणि इराणमध्ये 2019 नंतरचा सर्वात मोठा निषेध दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)