Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीची शक्यता नाही

जकार्ता वेळेनुसार (0823 GMT) दुपारी 3:23 वाजता हा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू वाकाटोबी रीजेंसीपासून 227 किमी ईशान्येस आणि समुद्राखाली 32 किमी खोलीवर होता.

Earthquake

इंडोनेशियाच्या आग्नेय सुलावेसी प्रांतात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी मोजली गेली. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे भूकंपामुळे त्सुनामी आला नाही. इंडोनेशियाची हवामानशास्त्र आणि जिओफिजिक्स एजन्सी बीएमकेजीने ही माहिती दिली आहे. जकार्ता वेळेनुसार (0823 GMT) दुपारी 3:23 वाजता हा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू वाकाटोबी रीजेंसीपासून 227 किमी ईशान्येस आणि समुद्राखाली 32 किमी खोलीवर होता, असे Xinhua न्यूज एजन्सीने बीएमकेजीच्या हवाल्याने म्हटले आहे. हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार या भूकंपानंतर सुनामी येण्याची शक्यता नाही. (हेही वाचा: लंडन ब्रिजवर तेलाच्या टँकर ट्रकचा स्फोट, एक ठार, अनेक जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now