इंडो-कॅनडियन शीख कवयित्री Rupi Kaur यांनी नाकारले US राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे निमंत्रण, कारण घ्या जाणून

US राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी दिलेले एका कार्यक्रमाचे निमंत्रण इंडो-कॅनडियन शीख कवयित्री रूपी कौर यांनी बुधवारी नाकारले. गाझापट्टीमध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवरुन आपण हे निमंत्रण नाकारल्याचे कवयित्रीने म्हटले आहे.

Rupi Kaur

इस्त्राययल-पॅलेस्टाईन संघर्षाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्राईलकडून हल्ले वाढविण्यात आले असून, गाझा पट्टीत अभूतपूर्व परिस्थिती निर्मण झाली आहे. या पार्श्वभूमीवर US राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी दिलेले एका कार्यक्रमाचे निमंत्रण इंडो-कॅनडियन शीख कवयित्री रूपी कौर यांनी बुधवारी नाकारले. गाझापट्टीमध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवरुन आपण हे निमंत्रण नाकारल्याचे कवयित्रीने म्हटले आहे. (हेही वाचा, IDF On Wael Asafa: हमासचा कमांडर वेल असफा याची हत्या, इस्रायल डिफेन्स फोर्सेसचा दावा)

आपल्या X पोस्टमध्ये, रुपी कौर यांनी म्हटले आहे की, नागरी वसाहतींमध्ये लष्करी कारवाईचे समर्थन करणाऱ्या किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही संस्थेचे निमंत्रण मी नाकारते. ज्या करावाईत अडकलेल्या नागरिकांमध्ये 50% लहान मुले आहेत.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now