India-Pakistan Tension: 'भारताने पुढील हल्ले थांबवल्यास आम्ही तणाव कमी करण्याचा विचार करू'; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री Ishaq Dar यांचे विधान

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर भारत थांबला तर आम्हीही थांबण्यास तयार आहोत. त्यांनी असेही म्हटले की पाकिस्तानला आणखी नुकसान नको आहे.

Pakistan Foreign Minister Ishaq Dar

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. 7 मे रोजी झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. नंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरात ड्रोन आणि तोफखान्याचे हल्ले केले. अशाप्रकारे दोन्ही देशांच्या सैन्याने एकमेकांच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केल्याने तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर भारत थांबला तर आम्हीही थांबण्यास तयार आहोत.

त्यांनी असेही म्हटले की पाकिस्तानला आणखी नुकसान नको आहे. ते म्हणाले, भारताने पुढील हल्ले थांबवल्यास ते तणाव कमी करण्याचा विचार करतील. मात्र, जर भारताने आणखी हल्ले केले तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. इशाक दार यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलल्यानंतर जिओ न्यूजला ही माहिती दिली. दुसरीकडे, केंद्र सरकारने म्हटले आहे की, भविष्यात भारतावर कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल. या हल्ल्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. (हेही वाचा: India-Pakistan Tension: ‘मदरसा विद्यार्थी हे आमची दुसरी संरक्षण फळी, गरज पडल्यास त्यांचा उपयोग सुरक्षा यंत्रणेसाठी केला जाईल'; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री Khawaja Asif यांचे संसदेत केलेले विधान व्हायरल)

India-Pakistan Tension:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement