Imran Khan’s Arrest Illegal: माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; झालेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर

सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खान यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Imran Khan (PC - Facebook)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. यासह त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. त्यांना उच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा लागेल, असेही सांगण्यात आले. इम्रान खान यांनी सरन्यायाधीशांना सांगितले की, कोर्टरूममधून त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांनी वॉरंट मागितले, पण त्यांना वॉरंट दाखवले गेले नाही. त्यांना गुन्हेगारासारखे वागवले गेले. सुटका झाल्यानंतर इम्रान खान यांनी सांगितले की, आपल्याला मारहाण करण्यात आली.

इम्रान खानच्या अटकेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी एनएबीला फटकारले. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खान यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, इम्रान खानच्या अटकेनंतर न्यायालयात कोणालाही सुरक्षित वाटणार नाही. न्यायालयाच्या आवारात अटक करणे ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे. हे थांबवले पाहिजे. इम्रान खान यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (हेही वाचा: Imran Khan Arrest: इम्रान खानच्या अटकेनंतर PM Shahbaz Sharif यांचे देशाला संबोधन, म्हणाले- 'आम्ही सूडाचे राजकारण करत नाही')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)