Imran Khan To Get Arrested Again? पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला पुन्हा होणार अटक? देशाला केले संबोधित, ट्वीटद्वारे दिली 'ही' माहिती
‘माझ्या पुढील अटकेपूर्वी कदाचित माझे शेवटचे ट्विट असावे. पोलिसांनी माझ्या घराला वेढा घातला आहे.’ अशा आशयाचे ट्वीट इम्रान खान यांनी केले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) प्रमुख इम्रान खान यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) रावळपिंडीने इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एनएबीने इम्रान खान यांना प्रश्नांची एक लांबलचक यादीही पाठवली आहे. समन्सनुसार, इम्रान खानला उद्या म्हणजेच 18 मे रोजी एनएबीसमोर हजर राहावे लागणार आहे. अशात आज म्हणजेच 17 मे रोजी इम्रान खान यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपली अटक आणि सध्याच्या सरकारबाबत आपले विचार मांडले.
‘माझ्या पुढील अटकेपूर्वी कदाचित माझे शेवटचे ट्विट असावे. पोलिसांनी माझ्या घराला वेढा घातला आहे.’ अशा आशयाचे ट्वीट इम्रान खान यांनी केले आहे. माजी पंतप्रधानांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला आहे. इम्रान खानच्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. पंजाबच्या अंतरिम सरकारने या दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला आहे. (हेही वाचा: अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खानला दिलासा; इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून 2 आठवड्यांचा जामीन मंजूर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)