Imran Khan Escapes Plane Crash: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानात तांत्रिक समस्या; भीषण अपघात टळला

ताबडतोब विमानातील फ्लाइटच्या कॅप्टनने कंट्रोल टॉवरशी संपर्क साधला आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग केले

Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पीटीआयचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाचा भीषण अपघात टळला आहे. हे विमान शनिवारी चकलालावरून गुजरांवाला येथे रॅलीसाठी जात असताना ही घटना घडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान एका खास विमानातून गुजरांवाला येथे रॅलीसाठी जात असताना टेकऑफनंतर लगेचच तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ताबडतोब विमानातील फ्लाइटच्या कॅप्टनने कंट्रोल टॉवरशी संपर्क साधला आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. इम्रान खान सुखरूप खाली उतरल्यानंतर ते रस्तामार्गाने रॅलीसाठी गुजरांवालाकडे रवाना झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)