'मला हिंदू असल्याचा अभिमान आहे, माझा भारत आणि तिथल्या लोकांशी नेहमीच संबंध राहील'- UK PM Rishi Sunak
ते म्हणाले, ‘2023 हे भारतासाठी मोठे वर्ष आहे. आम्ही भारतासोबत एकत्र काम करू.'
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारत आणि हिंदू धर्माबाबत अनेकदा विधाने केली आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी एका खास मुलाखतीत सांगितले की, ‘माझी पत्नी भारतीय आहे आणि हिंदू धर्माचा अभिमान असल्याने माझा भारत आणि भारतातील लोकांशी नेहमीच संबंध राहील. मला माझ्या भारतीय मुळांचा आणि भारताशी असलेल्या माझ्या संबंधांचा खूप अभिमान आहे.’ यंदा जी20 शिखर परिषदेसाठी सुनक भारतामध्ये येणार आहेत. ते म्हणाले, ‘2023 हे भारतासाठी मोठे वर्ष आहे. आम्ही भारतासोबत एकत्र काम करू आणि समोरच्या सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देऊ. पंतप्रधान मोदींसोबतची माझी भेट ही जागतिक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आहे आणि त्यांना तोंड देण्यासाठी ब्रिटन आणि भारताची मोठी भूमिका आहे.’ (हेही वाचा: Racial Online Posts: भारतीय वंशाचा Rapper Subhas Nair यास सिंगापूरमध्ये तुरुंगवासाची शिक्षा)