Same-Sex Relationship Banned in Uganda: युगांडात राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी अँटी-एलजीबीटीक्यू विधेयकावर केली स्वाक्षरी, एलजीबीटीक्यू आता गुन्हा म्हणून ओळखला जाणार

अहवालानुसार, हा कायदा लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअरसाठी असा पहिला दंडनीय कायदा आहे, जो युगांडाच्या संसदेने समलिंगी भागीदारांना (LGBTQ) शिक्षा करण्यासाठी मंजूर केला आहे.

Uganda President Yoweri Museveni

एका आफ्रिकन देशाने LGBTQ संदर्भात असा कायदा केला आहे की आता तेथे समलैंगिक संबंध ठेवल्यास कठोर शिक्षा होणार आहे. युगांडाच्या सरकारने देशात समलिंगी संबंधांसाठी कठोर कायदा केला आहे, जो LGBTQ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणालाही गुन्हेगार ठरवणार आहे. युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी या अहवालावर स्वाक्षरी केली. या अहवालानुसार, हा कायदा लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअरसाठी असा पहिला दंडनीय कायदा आहे, जो युगांडाच्या संसदेने समलिंगी भागीदारांना (LGBTQ) शिक्षा करण्यासाठी मंजूर केला आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)