Happy Diwali on Burj Khalifa in Dubai: दिवाळीनिमित्त जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर आकर्षक रोषणाई; दिल्या हिंदीतून खास शुभेच्छा (Video)

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर दिवाळीच्या रात्री अनोख्या पद्धतीने रोषणाई करत, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Burj Khalifa Wishes Everyone a Happy Diwali (Photo Credits: X/@airnewsalerts)

Happy Diwali on Burj Khalifa in Dubai: भारतासह जगभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी काल उत्साहात दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस, म्हणजेच लक्ष्मीपूजन पार पडले. या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने दुबईचा बुर्ज खलिफाही या आनंदाच्या उत्सवात सामील झाला. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर दिवाळीच्या रात्री अनोख्या पद्धतीने रोषणाई करत, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बुर्ज खलिफावरील हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दिवाळीच्या रात्री, बुर्ज खलिफावर एक विशेष लाइट शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय पारंपारिक सजावट, दिवे आणि रंगीबेरंगी लाईट्स दिसल्या.  या लाईट शो दरम्यान बुर्ज खलिफावर हिंदीतील 'हॅपी दीपावली' हा संदेश दिसला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Happy Diwali on Burj Khalifa in Dubai:

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement