Guinness World Records : मालदिव्हच्या पाण्यात ‘अंडर वॉटर किस’ करत कपलने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला (Watch Video)

पाण्याच्या खाली किस करत एका जोडप्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

मालदिव्हमध्ये (Maldives) एका जोडप्याने व्हॅलेंटाईन डे (Valantine Day) एकदम हटके साजरा केला अन् थेट विश्वविक्रम केला आहे. या जोडप्याने पाण्यात 4 मिनिट 6 सेकंदांपर्यंत चुंबन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) केला. एका हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये या जोडप्याने केलेल्या अनोख्या प्रेमाची विश्वविक्रमाच्या यादीत नोंद झालीय. दक्षिण आफ्रिकेतील बेथ नीले आणि कॅनडातील माईल्स क्लाउटीयर या जोडप्यानी हा विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3 मिनिटे आणि 24 सेकंद अंडर वॉटर किस केल्याची याआधी नोदं होती.

पहा व्हिडीयो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)