France's Youngest, First Gay PM: Gabriel Attal बनले फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; अवघ्या 34 व्या वर्षी स्वीकारणार देशाचा भार
अनेक सर्वेक्षणांमध्ये गॅब्रिएल अटल यांचे सर्वात लोकप्रिय सरकारी मंत्र्यांपैकी एक म्हणून वर्णन करण्यात आले आहे. मार्च 1989 मध्ये जन्मलेले तरुण फ्रेंच नेते अटल सध्या शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्रालय पाहत आहेत.
France's Youngest, First Gay PM: शिक्षण मंत्री गॅब्रिएल अटल यांची मंगळवारी (9 जानेवारी) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. यासह गॅब्रिएल (34 वर्षे) हे फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण आणि समलैंगिक पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी एलिझाबेथ बॉर्नची जागा घेतली आहे. इमिग्रेशनमुळे अलीकडेच उद्भवलेल्या राजकीय तणावामुळे एलिझाबेथ बॉर्न यांनी सोमवारी (8 जानेवारी) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. सोमवारी रात्री उशिरा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या निवर्तमान पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा स्वीकारला.
अनेक सर्वेक्षणांमध्ये गॅब्रिएल अटल यांचे सर्वात लोकप्रिय सरकारी मंत्र्यांपैकी एक म्हणून वर्णन करण्यात आले आहे. मार्च 1989 मध्ये जन्मलेले तरुण फ्रेंच नेते अटल सध्या शिक्षण आणि युवा व्यवहार मंत्रालय पाहत आहेत. याआधी ते सुमारे दोन वर्षे सरकारचे प्रवक्तेही होते. वयाच्या 32 व्या वर्षी ते मंत्री झाले. त्यांचे वडील ज्यू वंशाचे असल्याचे म्हटले जाते तर त्याच्या आईचे पूर्वज ग्रीक-रशियन होते. त्यांचे वडील वकील आणि चित्रपट निर्माता होते. आई एका चित्रपट निर्मिती कंपनीत काम करत होती. (हेही वाचा: German Farmers Protest: जर्मन सरकारविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर्ससह रस्त्यावर उतरत आंदोलन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)