Abdullah Ahmad Badawi Passes Away: मलेशियाचे माजी पंतप्रधान अब्दुल्ला अहमद बदावी यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'पाक लाह' म्हणून ओळखले जाणारे अब्दुल्लाह यांना रविवारी श्वसनाच्या त्रासामुळे क्वालालंपूर येथील स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हार्टमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे हृदयरोगतज्ज्ञांच्या पथकाकडून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.
Abdullah Ahmad Badawi Passes Away: मलेशियाचे माजी पंतप्रधान अब्दुल्ला अहमद बदावी (Abdullah Ahmad Badawi) यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. अब्दुल्ला बऱ्याच काळापासून आजारी होते. क्वालालंपूरमधील एका रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. अब्दुल्लाला न्यूमोथोरॅक्स नावाच्या आजाराने ग्रासले होते. 'पाक लाह' म्हणून ओळखले जाणारे अब्दुल्लाह यांना रविवारी श्वसनाच्या त्रासामुळे क्वालालंपूर येथील स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हार्टमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे हृदयरोगतज्ज्ञांच्या पथकाकडून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. पण सर्व प्रयत्नांना न जुमानता, सोमवारी संध्याकाळी 7:10 वाजता त्यांचे निधन झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)