New York Daily News: ऑलिव्हिया कॅराबॅलोचा वयाच्या चौथ्या वर्षी मॅकडोनाल्डच्या चिकन नगेट घेत असताना पाय जाळला होता. एका स्थानिक अहवालानुसार तीला सेकंड डिग्री बर्न झाल्याचे समोरआले. तीची मांडीवर गंभीर जखमा झाल्यामुळे कुटूंबाने कोर्टात केस टाकली. कुटूंबाने केलेल्या दावानुसार २०० डीग्री पेक्षा जास्त गरम होते. ड्राईव्ह-थ्रूमधून सहा-पीस चिकन मॅकनगेट्स हॅपी मील ऑर्डर केले होते आणि तो बॉक्स मागच्या सीटवर असलेल्या ऑलिव्हियाला दिला होता. २०१९ पासून कोर्टात खटला चालू होता. दरम्यान कोर्टाने आदेश जारी केले. फ्लोरिडा ज्युरीने 8 वर्षांच्या मुलीला $800,000 नुकसान भरपाई दिली. अशी माहिती स्थानिक वृत्ताने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)