Firing During Party in America: अमेरिकेत पार्टीदरम्यान जोरदार गोळीबार, अनेकांचा मृत्यू; गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेतील टेनेसी राज्यातील मेम्फिस शहरात एका ब्लॉक पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ऑरेंज माऊंड परिसरातील कार्नेस अव्हेन्यू आणि ग्रँड स्ट्रीटवर हा गोळीबार झाला.

Photo Credit - X

Firing During Party in America : अमेरिकेत सध्या गोळीबाराच्या (Firing in US) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. टेनेसी राज्यातील मेम्फिस शहरात एका ब्लॉक पार्टीदरम्यान गोळीबार(Shootout) झाला. झालेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ऑरेंज माऊंड परिसरातील कार्नेस अव्हेन्यू आणि ग्रँड स्ट्रीट येथे गोळीबार झाला. (हेही वाचा :US Mass Shooting Video: अमेरिका हादरली! शिकागोमध्ये गोळीबारात 7 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल )

अनेक जखमी

अद्याप मृतांचा आकडा जाहीर झालेला नाही. परंतु स्थानिक वृत्तानुसार, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनेचा तपास करत असून गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement