FAA Outage: संपूर्ण अमेरिकेची विमानसेवा ठप्प, शेकडो उड्डाणे प्रभावित; Federal Aviation Administration च्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये बिघाड

तांत्रिक बिघाडामुळे 1000 विमानसेवा उशिराने सुरू आहे.

Flight (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेत काही तांत्रिक बिघाडामुळे देशातील सर्व विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे हजारो लोक अडकले आहेत. अनेक अहवालांनुसार, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील उड्डाणे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. अहवालानुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम कमांड सेंटरने प्रवाशांना दीर्घ विलंबासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच सध्या या समस्येवर कोणताही तोडगा निघत नसल्याचेही कमांड सिस्टमकडून मान्य करण्यात आले आहे.

जी उड्डाणे टेक ऑफ होणार होती किंवा टेक ऑफ झाली होती ती खाली घेण्यात आली आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे 1000 विमानसेवा उशिराने सुरू आहे. यामध्ये देशांतर्गत आणि परदेशातील फ्लाइट ऑपरेशन्सचा समावेश आहे. अमेरिकन वेळेनुसार पहाटे 5.31 च्या सुमारास हा तांत्रिक बिघाड उघडकीस आला. मात्र, यामागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.