Elon Musk Congratulates Narendra Modi: एलोन मस्क यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन; म्हणाले, 'माझ्या कंपन्या भारतात काम करण्यास उत्सुक आहेत'
टेस्लाने भारतात कारचे उत्पादन सुरू करण्याची योजना आखली आहे आणि स्पेसएक्सने भारतासोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत भाष्य केले आहे.
Elon Musk Congratulates Narendra Modi: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर परदेशातून नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणाऱ्या संदेशांचा ओघ सुरूच आहे. आता टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनीही मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी X वर पोस्ट केले की, ‘जगातील सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकीतील तुमच्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींचे अभिनंदन! माझ्या कंपन्या भारतात रोमांचक काम करणाऱ्याची वाट पाहत आहे.’ टेस्लाने भारतात कारचे उत्पादन सुरू करण्याची योजना आखली आहे आणि स्पेसएक्सने भारतासोबत अंतराळ क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत भाष्य केले आहे. (हेही वाचा: 'Flower Bouquets Are New Soan Papdi': एनडीए नेत्यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा-पुन्हा भेट दिला एकच पुष्पगुच्छ, मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Watch)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)