Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप; दिल्ली पर्यंत जाणवले धक्के

अफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपांचा इतिहास आहे आणि रेड क्रॉसच्या मते, हिंदूकुश पर्वतरांगा हा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्र आहे जिथे दरवर्षी भूकंप होतात.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल  स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  भारतीय वेळेनुसार पहाटे 4.43 च्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत. एनसीएसनुसार, भूकंप 75 किलोमीटर खोलीवर झाला. अफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपांचा इतिहास आहे आणि रेड क्रॉसच्या मते, हिंदूकुश पर्वतरांगा हा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय क्षेत्र आहे जिथे दरवर्षी भूकंप होतात. अफगाणिस्तान मध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे vulnerable communities चे नुकसान होते,  हे समुदाय आधीच दशकांपासून सुरू असलेल्या संघर्ष आणि अविकसिततेशी झुंजत आहेत आणि एकाच वेळी येणाऱ्या अनेक धक्क्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे फारशी लवचिकता नाही, असे UNOCHA ने नमूद केले आहे. Earthquake Safety And Emergency Response: भूकंप काळात स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण कसे करावे? घ्या जाणून .

 अफगाणिस्तान पुन्हा हादरले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement