Earthquake in Pakistan: पाकिस्तानमध्ये पुन्हा भूकंप; इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आसपासच्या शहरांमध्ये जाणवले जोरदार धक्के
इस्लामाबादमध्ये रात्री 9:50 च्या सुमारास भूकंपाचे अनेक धक्के जाणवले, जे 4-5 सेकंदांपर्यंत टिकले.
इस्लामाबाद आणि पाकिस्तानच्या इतर शहरांमध्ये बुधवारी रात्री भूकंपाचे मध्यम धक्के जाणवले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबमधील रावळपिंडी, अट्टक आणि चकवाल जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबादमध्ये रात्री 9:50 च्या सुमारास भूकंपाचे अनेक धक्के जाणवले, जे 4-5 सेकंदांपर्यंत टिकले.
याआधी पाकिस्तानात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली. मात्र, यात कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (NSMC) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 133 किमी खोलीवर होता. त्याचे केंद्र भारतातील जम्मू आणि काश्मीर होते. राजधानी इस्लामाबादसह इतर शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर आज पुन्हा देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. (हेही वाचा: South Africa Wildfire Videos: सायमन टाउनमधील सर्वात मोठ्या नौदल तळाच्या जंगलात आग लागल्याने पाच जखमी)