चीनच्या Alibaba ग्रुपने 3 महिन्यात 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; जाणून घ्या कारण

रिपोर्टनुसार, साउथ चायना मॉर्निंग पोस्टचे मालक अलीबाबाच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

Alibaba Group (Photo Credits: Alibaba)

चीनचा ई-कॉमर्स दिग्गज समूह अलीबाबाने देशातील 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मंदावलेली विक्री आणि घसरलेली अर्थव्यवस्था यामुळे खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, जून तिमाहीत 9,241 हून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनीला अलविदा केले आहे. कंपनीने आपले एकूण कर्मचारी 2,45,700 पर्यंत कमी केले आहेत.

रिपोर्टनुसार, साउथ चायना मॉर्निंग पोस्टचे मालक अलीबाबाच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या वर्षी जूनपर्यंत 13,616 कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. मार्च 2016 नंतर कंपनीची ही पहिली घसरण आहे. अलीबाबाचे अध्यक्ष आणि सीईओ डॅनियल झांग योंग म्हणाले की कंपनी यावर्षी सुमारे 6,000 नवीन विद्यापीठ पदवीधरांची नियुक्ती करेल. अलीबाबाने जून तिमाहीत निव्वळ उत्पन्नात 50 टक्क्यांची घट नोंदवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now