British MP Took Oath With Bhagavad Gita: ब्रिटीश खासदार Bob Blackman यांनी चक्क बायबल आणि भगवद्‌गीतेवर हाथ ठेऊन घेतली शपथ, व्हिडिओ व्हायरल (Watch)

ते जुलै 2024 मध्ये बॅकबेंच 1922 समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

Bob Blackman

British MP Took Oath With Bhagavad Gita: ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी आज चक्क बायबल आणि भगवद्गीता हातात घेऊन शपथ घेतली. याबाबत ब्लॅकमन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ब्लॅकमन म्हणतात, 'सार्वत्रिक निवडणुकीनंतर संसदेत परतताना किंग जेम्स बायबल आणि गीतेवर हाथ ठेऊन महाराज चार्ल्स यांच्याशी निष्ठेची शपथ घेतल्याचा अभिमान वाटतो.' रॉबर्ट जॉन ब्लॅकमन सीबीई यांचा जन्म 26 एप्रिल 1956 झाला असून, ते ब्रिटिश कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे राजकारणी आहेत. ते जुलै 2024 मध्ये बॅकबेंच 1922 समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. ते 2010 पासून हॅरो ईस्टचे संसद सदस्य देखील आहेत. त्यांनी 2012 ते 2024 पर्यंत बॅकबेंच 1922 समितीचे संयुक्त कार्यकारी सचिव म्हणून काम केले आहे. (हेही वाचा: भारतीय-अमेरिकन अल्पसंख्याक समुदायाने न्यूयॉर्कमध्ये साजरा केला PM Narendra Modi यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा आनंद)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)