Auckland New Year 2022 Celebration: न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात उजाडले नवीन वर्षे; फटाक्यांच्या आतिषबाजीने केले स्वागत (Watch Video)
आज संपूर्ण जगामध्ये 2021 चा शेवटचा दिवस असून, उद्या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे
आज संपूर्ण जगामध्ये 2021 चा शेवटचा दिवस असून, उद्या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. परंतु जगातील अनेक देशांमध्ये नवीन वर्षे उजाडले आहे. न्यूझीलंड हा त्यातीलच एक देश. न्यूझीलंडचे ऑकलंड शहर हे नवीन वर्ष 2022 चे स्वागत करणारे पहिले शहर ठरले आहे. शहरात मोठी आतिषबाजी करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. नवीन वर्षाचे स्वागत ऑकलंडच्या स्कायटॉवरवर दिवे लावून केले जाते. एएनआयने त्यांच्या सोशल मिडियावर ऑकलंड शहरातील सेलिब्रेशनचे थेट प्रक्षेपण केले आहे.
दरम्यान, रशियात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता नवीन वर्षाची सुरुवात होते. याशिवाय ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात संध्याकाळी 6.25 वाजता नवीन वर्ष दार ठोठावणार आहे. जपानमधील टोकियो येथे रात्री आठ वाजता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. हाँगकाँगमध्ये रात्री 9.30 वाजता नवीन वर्ष सुरू होईल. यासह सिंगापूर, बँकॉकसारख्या ठिकाणीही भारताआधी नवीन वर्ष सुरु होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)