Angry CEO Fires 99 Employees: सकाळच्या मीटिंगला आले नाहीत 99 लोक, चिडलेल्या सीईओने सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले- Reports
एका इंटर्नने सोशल मीडियावर याबाबतचा एक स्क्रीन शॉट शेअर केला आणि सांगितले की त्याला एका म्युझिक इन्स्ट्रुमेंट कंपनीत इंटर्न म्हणून कामावर घेण्यात आले होते, पण जॉइन केल्याच्या तासाभरातच त्याला काढून टाकण्यात आले.
यूएस-आधारित कंपनीच्या सीईओने आपल्या 111 पैकी 99 कर्मचाऱ्यांना ते मिटींग्जसाठी उपस्थित राहिले नसल्याने त्यांना कामावरून काढून टाकले आहे. एका इंटर्नने सोशल मीडियावर याबाबतचा एक स्क्रीन शॉट शेअर केला आणि सांगितले की त्याला एका म्युझिक इन्स्ट्रुमेंट कंपनीत इंटर्न म्हणून कामावर घेण्यात आले होते, पण जॉइन केल्याच्या तासाभरातच त्याला काढून टाकण्यात आले. सीईओने सांगितले की, तुम्ही कामावर घेण्याच्या वेळी मान्य केलेल्या धोरणाची पूर्तता केली नाही. त्यामुळे केवळ मीटिंगला उपस्थित राहिलेल्या लोकांनाच कंपनीमध्ये ठेवले जाईल, इतर लोकांना काढून टाकले जात आहे. सीईओने कर्मचाऱ्यांना कंपनीकडून जे काही घेतले आहे ते परत करण्यास सांगितले आहे. रेडिटची ही पोस्ट व्हायरल होताच कंपनीच्या सीईओने लोकांचे लक्ष वेधून घेतले. बाल्डविन ओडसन असे या सीईओचे नाव असून त्याच्या लिंक्डइन पृष्ठावर एक नजर टाकल्यावर असे दिसून आले की तो 'द म्युझिशियन्स क्लब'चा संस्थापक आहे. (हेही वाचा: Tata Group to Create Jobs: टाटा समूहाने आखली 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देण्याची योजना; 'या' क्षेत्रांमध्ये उपलब्ध होणार रोजगार, जाणून घ्या सविस्तर)
Angry CEO Fires 99 Employees:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)