Ajay Banga World Bank New President: भारतीय अमेरिकन उद्योगपती अजय बंगा असतील जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष
पुण्यात जन्मलेल्या बंगा यांनी 70 च्या दशकात शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते.
भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष होणार आहेत. बुधवारी अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची पुष्टी जागतिक बँकेने केली आहे. बँकेने बंगा यांच्या नेतृत्वाला पाच वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता देण्याच्या मतानंतर लगेचच प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले की, ‘जागतिक बँक समूह बंगासोबत काम करण्यास उत्सुक आहे. ते ही भूमिका स्वीकारतील.’ जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जवळपास वर्षभरापूर्वी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या उमेदवारीला भारताने पाठिंबा दिला. पुण्यात जन्मलेल्या बंगा यांनी 70 च्या दशकात शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. (हेही वाचा: जगभरातील अनेक देशांमध्ये आर्थिक मंदीची शक्यता; भारताला मिळणार दिलासा, जाणून घ्या कोणत्या देशांना बसणार सर्वाधिक फटका)