Israel Declares State of War: हमासच्या हल्ल्यानंतर एअर इंडियाकडून इस्रायलची विमानसेवा रद्द

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले. या हल्ल्यात 40 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला होता. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने 'युद्ध' जाहीर केले आहे.

Air India Flight (PC - Wikimedia Commons)

एअर इंडियाचे दिल्ली ते तेल अवीव आणि परतीचे उड्डाण AI140 तेल अवीव ते दिल्ली 07 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द करण्यात आले आहे. एअर इंडियाने सांगितले की, आमचे पाहुणे आणि क्रू यांचे हित आणि सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले. या हल्ल्यात 40 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला होता. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने 'युद्ध' जाहीर केले आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने सांगितले की, हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही ऑपरेशन 'लोखंडी तलवार' सुरू केले आहे. याद्वारे गाझा पट्टीवर हवा, जमीन आणि समुद्रातून रॉकेट डागले जात आहेत. इस्रायली हवाई दलाच्या डझनभर लढाऊ विमानांनी संपूर्ण गाझा पट्टीमध्ये 17 लष्करी संकुल आणि दहशतवादी संघटना हमासच्या 4 मुख्यालयांवर हल्ला केला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement