US: युएस येथील माफिया अॅंटोनियो कोनिग्लियारो याचा अपघाती मृत्यू, घटनेचा Video व्हायरल

युनाडेट स्टेटमध्ये एक भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रुकलिनमध्ये एका ८६ वर्षीय वृध्दाला ट्रकने धडक दिली आहे.

US MAFIYA ACCIDENT PC TW

US: युनाडेट स्टेटमध्ये एक भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रुकलिनमध्ये एका ८६ वर्षीय वृध्दाला ट्रकने धडक दिली आहे. या धडकेत वृध्दांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्ता ओंलाडताना ट्रक चालकाने वृध्दाला चिरडले आहे. वृध्द व्यक्तीची ओळख अॅंटोनियो कोनिग्लियारो अशी झाली आहे, एकेकाळी हा माफिया असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही. रस्ता ओलांडताना त्याचा भयावह अपघात झाला यात त्यांचे शरिर धडापासून वेगळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा- घरकामगारांचे शोषण केल्याप्रकरणी अब्जाधीश हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना 4.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement