BangladeshFire: ढाका येथील सात मजली इमारतीला आग, दुर्घटनेत 44 लोकांचा मृत्यू
बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोडवर सात मजली इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
BangladeshFire: बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोडवर सात मजली इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री घडली आहे.इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि क्षणातच ही आग वर पर्यंत पसरली. या भीषण आगीत 44 लोकांचा मृत्यू झाला आणइ 20 हून अधिक जण जखमी झाले आहे अशी माहिती ढाका ट्रिब्यूनने दिले आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहेत. घटनास्थळी शहरातील प्रशासन व्यवस्था दाखल झाली आहे. एका अधिकाऱ्यांने सांगितल्याप्रमाणे, आगीत 65 लोक अडकले होते. त्यापैकी 42 लोक बेशुध्द झाले. घटनास्थळी 13 अग्निशमन दलाच्या गाड्या हजर झाल्या आहेत. आरोग्य मंत्री डॉ. सामंन लाल सेन यांनी सांगितले की, ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी दोन रुग्णालयात लोकांवर उपचार सुरु आहे.