Somalia Terrorist Attack: सोमालियातील लिड्डो बीचवर आत्मघाती बॉम्बहल्ला आणि गोळीबार; 32 ठार, 63 जखमी (Watch Video)
सोमालियातील मोगादिशू येथील लिड्डो बीचवर विनाशकारी दहशतवादी हल्ला नागरिकांनी अनुभवला. आत्मघातकी बॉम्बहल्ला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात 32 जणांचा मृत्यू झाला. तर, 63 जण जखमी झाले आहेत.
- Read in
- मराठी
Somalia Terrorist Attack: सोमालियातील मोगादिशू येथील लिड्डो बीचवर विनाशकारी दहशतवादी हल्ला (Somalia Terrorist Attack)झाला. आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेल्या बंदुकींच्या हल्ल्यात (Gun Attack) 32 जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय, 63 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी, 2 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. अल-शबाब या अतिरेकी गटाच्या एका बॉम्बरने समुद्रकिनाऱ्यावर स्फोट केला. त्यानंतर बंदूकीने तेथे गोळीबार झाला. X वर शेअर केलेले व्हिडिओ समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेले मृतदेह आणि लोक सुरक्षिततेसाठी पळून जात असलेले भयानक दृश्य दाखवत आहेत.(हेही वाचा:Uttar Pradesh: अलिगडयेथे शाळेत शिक्षिकेचा कारनामा! चटई अंथरूण झोपली, चिमुकल्यांकडून हातातील पंख्याने हावा (Watch Video))
व्हिडीओ
🇸🇴#Breaking An Al-Shabaab suicide bomber carried out a suicide attack tonight on Liido beach in the Somali capital Mogadishu. Many are said to be dead. A hotel full of civilians on the beach was also reportedly attacked.#Mogadishu pic.twitter.com/HTQM1iDZAw
— Turkish News (@hsimsek78) August 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2024 04:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

