Google for India: Google ने DigiLocker सोबत केली भागीदारी; आता वापरकर्ते Android फोनवर करू शकतात सरकारी आयडी संग्रहित
डिजीलॉकर हे एक प्रकारचे व्हर्च्युअल लॉकर आहे. यामध्ये कागदपत्रे पेपरलेस स्वरूपात ठेवता येतात. डिजीलॉकरमध्ये सेव्ह केलेली कागदपत्रे पूर्णपणे वैध आहेत.
Google for India: गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई सोमवारी दिल्लीच्या प्रगती मैदानावर गुगलच्या भारतासाठी 2022 च्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भविष्यासंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले की, आम्ही UPI स्टॅकवर आधारित Google Pay भारतात तयार केले आहे. कंपनी शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेलवरही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो भाषांमध्ये माहिती पोहोचवण्याची त्याची खासियत असेल. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. पिचाई आणि वैष्णव यांच्यात भारतातील AI आणि AI आधारित उपायांबद्दल चर्चा झाली. यानंतर, कार्यक्रमात उपस्थित सुंदर पिचाई यांनी Google च्या आगामी मोठ्या वैशिष्ट्यांबद्दल घोषणा केली.
DigiLocker -
कार्यक्रमात अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांसाठी नवीन फीचरची घोषणा करण्यात आली. यासह, वापरकर्ते Google Files अॅपद्वारे DigiLocker वापरण्यास सक्षम असतील.
डिजीलॉकर काय आहे -
डिजीलॉकर हे एक प्रकारचे व्हर्च्युअल लॉकर आहे. यामध्ये कागदपत्रे पेपरलेस स्वरूपात ठेवता येतात. डिजीलॉकरमध्ये सेव्ह केलेली कागदपत्रे पूर्णपणे वैध आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)