IPL Auction 2025 Live

US Set to Ban TikTok? भारतानंतर आता अमेरिकेचाही चीनला दणका; टिकटॉकवर बंदी घालणारे विधेयक सभागृहात मंजूर

यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने बुधवारी हे विधेयक मंजूर केले.

TikTok (PC - pixabay)

US Set to Ban TikTok? भारतानंतर आता अमेरिकाही चिनी ॲप टिकटॉक बंद करणार आहे. यूएस हाऊसने टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक यावर जोर देते की, एकतर टिकटॉकने त्याच्या चीनी मालक ByteDance पासून स्वतःला  वेगळे केले पाहिजे किंवा त्याने अमेरिका सोडली पाहिजे. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने बुधवारी हे विधेयक मंजूर केले. कंपनीच्या सध्याच्या मालकी संरचनेला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे लक्षात घेऊन अमेरिकन खासदारांनी हे पाऊल उचलले आहे. प्रतिनिधीगृहात या विधेयकाच्या बाजूने 352 आणि विरोधात 65 मते पडल्याने हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आता सिनेटकडे जाईल, जिथे ते मंजूर होण्याची शक्यता अस्पष्ट आहे. विधेयकात असे म्हटले आहे की, टिकटॉकची मूळ कंपनी ByteDance ने हे ॲप 180 दिवसांच्या आत (सहा महिन्यांत) विकणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास अमेरिकेत ॲपल आणि गुगल ॲप स्टोअरवर या ॲपवर बंदी घालण्यात येईल. टिकटॉकचे अमेरिकेमध्ये 170 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. टिकटॉक ही चिनी तंत्रज्ञान कंपनी ByteDance Ltd ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. (हेही वाचा: Mobile Phone Addiction in Children: स्मार्टफोनचे व्यसन 10 वर्षांखालील मुलांसाठी घातक, जाणून घ्या दुष्परिणाम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)