UPI Transactions in November: नोव्हेंबरमध्ये युपीआयचा नवा विक्रम; झाले 17.40 लाख कोटी रुपयांचे व्यवहार

जर युपीआय व्यवहारांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर, नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 1.5 टक्के अधिक व्यवहार झाले.

United Payments Interface (Photo Credits: Twitter)

भारतातील डिजीटल पेमेंट दर महिन्याला नवीन उंची गाठत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने नोव्हेंबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठला. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात 17.40 लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार झाले. ऑक्टोबर महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून 17.16 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या संदर्भात, ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात 1.4 टक्के अधिक व्यवहार झाले. जर युपीआय व्यवहारांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर, नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 1.5 टक्के अधिक व्यवहार झाले. ऑक्टोबरमध्ये 11.41 अब्ज व्यवहार झाले, तर नोव्हेंबर महिन्यात 11.24 अब्ज व्यवहार झाले. सप्टेंबर महिन्यात एकूण 10.56 अब्ज व्यवहार झाले, ज्यांचे मूल्य 15.8 लाख कोटी रुपये होते. डेटावरून असे दिसून आले आहे की, नोव्हेंबरचे आकडे हे गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत व्यवहार संख्या आणि मूल्य बाबतीत अनुक्रमे 54 टक्के आणि 46 टक्के जास्त होते. यंदा ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये आयएमपीएस (IMPS) व्यवहारांची संख्या 4 टक्क्यांनी घसरून, 47.2 कोटी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ती 49.3 कोटी आणि सप्टेंबरमध्ये 47.3 कोटी होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now