Twitter Down: ट्विटर पुन्हा डाऊन; वापरकर्त्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना
रविवारी सायंकाळी 7 वाजता काही युजर्संनी याबाबत तक्रार केली. भारतात संध्याकाळी 7 वाजता, 1,747 लोकांनी DownDetector वेबसाइटवर Twitter संदर्भात तक्रार नोंदवली.
Twitter Down: रविवारी ट्विटरचा सर्व्हर डाऊन (Twitter Down) झाला. रविवारी सायंकाळी 7 वाजता काही युजर्संनी याबाबत तक्रार केली. भारतात संध्याकाळी 7 वाजता, 1,747 लोकांनी DownDetector वेबसाइटवर Twitter संदर्भात तक्रार नोंदवली. याआधी शनिवारी गुगलची ईमेल सेवा 'जीमेल'ची सेवा काही काळासाठी प्रभावित झाली होती. यादरम्यान अनेक यूजर्सनी सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार केली होती. Gmail च्या अॅप आणि डेस्कटॉप दोन्ही वर्जनसह अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागला.
अॅप्स आणि वेबसाइट्सच्या ऑनलाइन स्टेटसचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टर या वेबसाइटने रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ट्विटरच्या सेवा खंडित झाल्याची माहिती दिली. मात्र, डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनंतर सोशल मीडिया कंपनीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. यापूर्वी जुलैमध्ये मायक्रो-ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार नोंदवली होती, त्यानुसार त्यांना ट्विटर ऍक्सेस करण्यात अडचणी येत होत्या. त्यांना ट्विट करण्यात आणि ट्विट पाहण्यात समस्या येत होत्या. (हेही वाचा -Twitter Down: पुन्हा ट्विटर डाउन? ट्विटरवर प्लॅटफॉर्म आउटेज आल्याने वापरकर्त्यांकडून ट्विटर डाउन ट्रेण्ड)
फेब्रुवारीमध्ये ट्विटर दोनदा ठप्प -
फेब्रुवारी 2022 मध्येही ट्विटरच्या सेवा आठवड्यातून दोनदा ठप्प झाले होते. अनेक यूजर्सला ट्विटर वापरताना त्रास होत होता. युजर्सच्या म्हणण्यानुसार, अॅप ओपन केल्यावर त्यांना 'समथिंग वेंट रॉंग' आढळते. 'Try Reloading' असा संदेश दिसत होता.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2022 08:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

