Twitter Blocks ANI's Account: ट्विटरने सस्पेंड केले 'एएनआय' या वृत्तसंस्थेचे अकाउंट, समोर आले धक्कादायक कारण
एलोन मस्कच्या कंपनीनेही खाते काढून टाकले गेल्याबद्दल एएनआयला ईमेल पाठवला आहे. स्मिता यांनी ट्विटरवर या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने एएनआय या वृत्तसंस्थेचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केले आहे. शनिवारी एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी याप्रकरणी ट्विट केले. एलोन मस्कच्या कंपनीनेही खाते काढून टाकले गेल्याबद्दल एएनआयला ईमेल पाठवला आहे. स्मिता यांनी ट्विटरवर या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. एएनआयला पाठवलेल्या ईमेलमध्ये ट्विटरने म्हटले आहे की, एएनआयचे खाते त्यांच्या धोरणाचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे कंपनीने हे अधिकृत खाते लॉक केले आहे. ट्विटरने पुढे म्हटले आहे की, ट्विटर अकाउंट बनवण्यासाठी किमान 13 वर्षे वय असणे आवश्यक आहे, परंतु एएनआयच्या खात्याने वयाची अट पाळली नाही म्हणून त्यांचे खाते ब्लॉक करण्यात आले आहे. स्मिता यांनी सांगितले की, एएनआयच्या अकाउंटवर 76 लाख फॉलोअर्स होते. (हेही वाचा: ॲप आधारित वाहनांच्या सेवेसाठी लागू होणार नियम; नागरिकांना 9 मे पर्यंत अभिप्राय कळविण्याचे आवाहन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)