Sunita Williams Dancing in Space: अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी केला डान्स, नासाने शेअर केला Video

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि क्रूमेट बुच विल्मोर यांच्यासह बोइंग स्टारलाइनर गुरुवारी आंतराराष्ट्रीय अंतराळात यशस्वी आणि सुरक्षितपणे पोहोचले.

Sunita Williams Dancing in Space: PC TWITTER

Sunita Williams Dancing in Space:  भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक कामगिरि केली आहे. सुनीता विल्यम्स अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळयान उडवणारी पहिली महिला ठरली आहे. 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी “बुच” विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. स्पेस स्टेशनवर यशस्वीपणे पहोचल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आनंदात डान्स केला आहे. ISS वर असलेल्या इतर अंतराळवीरांना मिठी मारली. यासंबंधीची एक व्हिडिओ X वर व्हायरल होत आहे. तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण घेतल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (हेही वाचा- भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांचे तिसऱ्यांदा अंतराळ उड्डाण; बोईंगच्या Starliner अंतराळयानाद्वारे रात्री 8:22 वाजता घेतली झेप

सुनीता विल्यम्स अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळयान उडवणारी पहिली महिला ठरली आहे. 58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी "बुच" विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. सुनीता विल्यम्स शुक्रवारी 7 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचल्या. स्पेस स्टेशनवर तिचे आगमन साजरे करण्यासाठी, तिने नृत्य केले आणि ISS वर असलेल्या इतर अंतराळवीरांना मिठी मारली. यासंबंधीची एक क्लिप X वर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)