Chandrayaan 3: सारं सुरळीत पार पडल्यास कधी होणार चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग? ISRO Chief S Somanath यांनी सांगितली तारीख, वेळ!
सुमारे 600 कोटी रूपये यासाठी सरकारने मोजले आहेत.
चंद्रयान 2 च्या वेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये लॅन्डिंग होऊ न शकल्याने वैज्ञानिकांचा हिरमोड झाला होता पण यंदा त्या चूका दुरूस्त करत पुन्हा चंद्रयान 3 अवकाशामध्ये झेपावलं आहे. आज पहिला टप्पा पार करून चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या या यानाने सारं सुरळीत पार पाडल्यास ते 23 ऑगस्टला संध्याकाळी 5.47 च्या सुमारास सॉफ्ट लॅन्डिंग करेल असा अंदाज आज ISRO chief S Somanath यांनी बोलताना सांगितला आहे. दरम्यान काल वैज्ञानिकांनी या चंद्रयानाच्या यशस्वी मोहिमेसाठी उड्डाणापूर्वी तिरूपतीचं दर्शन देखील घेतलं आहे. तेव्हा देखील ISRO chief S Somanath उपस्थित होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)