Samsung Store in Mumbai: सॅमसंगने मुंबईत सुरु केले आपले पहिले ऑनलाइन-टू-ऑफलाइन लाईफस्टाईल स्टोअर; जाणून घ्या काय असेल खास
ग्राहक सॅमसंग बीकेसी येथे 23 जानेवारीपासून नवीनतम Galaxy S24 सिरीज अनुभवू शकतील आणि प्री-बुक करू शकतील.
Samsung Store in Mumbai: सॅमसंगने मंगळवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलमध्ये आपल्या भारतातील पहिल्या ऑनलाइन-टू-ऑफलाइन (O2O) लाईफस्टाईल स्टोअरचे उद्घाटन केले. ग्राहक सॅमसंग बीकेसी येथे 23 जानेवारीपासून नवीनतम Galaxy S24 सिरीज अनुभवू शकतील आणि प्री-बुक करू शकतील. हे नवीन स्टोअर, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी ‘एआय फॉर ऑल’ ते मोबाइल उपकरणांसाठी ‘गॅलेक्सी एआय’ पर्यंत, सॅमसंगचे नवीनतम एआय (AI) अनुभव प्रदान करेल.
सॅमसंग दक्षिण पश्चिम आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क यांनी एका निवेदनात म्हटले आहे, 'आम्ही आठ अनन्य झोनमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले अनुभव क्युरेट केले आहेत, ज्यात सर्व विभागातील लोकांना उत्तेजित करण्यासाठी आमचे सर्व एआय अनुभव समाविष्ट आहेत. येथे, ग्राहकांना आमच्या विस्तारित कनेक्टेड फोन्स इकोसिस्टम आणि आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अनुभूती मिळेल.' सॅमसंग बीकेसी आठ अद्वितीय लाईफस्टाईल झोनमध्ये विभागले गेले आहे. (हेही वाचा: Twitter Audio Video Call Feature: प्रतिक्षा संपली! आता ट्विटरवरूनही करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल; 'असा' करा वापर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)