Peru To Adopt UPI Technology: आता दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात सुरु होणार युपीआय व्यवहार; NIPL ने केली सेंट्रल बँकेशी भागीदारी

ही धोरणात्मक भागीदारी सेंट्रल रिझर्व्ह बँक ऑफ पेरू (BCRP) ला देशामध्ये एक कार्यक्षम पेमेंट स्टेज स्थापित करण्यास आणि व्यक्ती तसेच व्यावसायिक क्षेत्रांमध्ये, त्वरित पेमेंट सुलभ करण्यास सक्षम करते.

UPI (Photo Credits: AIR/ Twitter)

Peru To Adopt UPI Technology: आजच्या काळात युपीआय हा लोकांसाठी सर्वात सोपा आणि एक विश्वासार्ह व्यवहार पर्याय ठरत आहे. देशात मोठ्या प्रमाणावर युपीआयचा अवलंब केला आहे. यासह गेल्या काही महिन्यांमध्ये भारताबाहेरदेखील युपीआयचा वापर सुरु झाला आहे. आता हा पर्याय आता दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाने पसंत केला आहे.  वास्तविक, एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) आणि रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी पेरू देशात युपीआयसारखी पेमेंट प्रणाली लागू करण्यासाठी भागीदारी केली आहे. याद्वारे पेरू हा देश युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश बनला आहे.

ही धोरणात्मक भागीदारी सेंट्रल रिझर्व्ह बँक ऑफ पेरू (BCRP)  ला देशामध्ये एक कार्यक्षम पेमेंट स्टेज स्थापित करण्यास आणि व्यक्ती तसेच व्यावसायिक क्षेत्रांमध्ये, त्वरित पेमेंट सुलभ करण्यास सक्षम करते. एनपीसीआय आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश शुक्ला यांनी सांगितले की, या भागीदारीचा उद्देश पेरूच्या आर्थिक पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे. एनआयपीएल ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. (हेही वाचा: WhatsApp Bans 70 Lakh Indian Users: भारतातील तब्बल 70 लाख व्हॉट्सॲप वापरकर्त्यांवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now