UPI LITE : पेटीएम अ‍ॅपवर आता युपीआय लाइट सेवा उपलब्ध ; कमी रक्कमेच्या व्यवहार करणाऱ्यांसाठी ठरणार लाभदायी

ऑनलाईन व्यवहारासाठी वापरण्यात येणाऱ्या पेटीएम अ‍ॅपवर आता कमी रक्कमेचे व्यवहार करणे अधिक सोप्पे होणार आहे.

paytm

पेटीम पेमेंटस बँक (Paytm)द्वारा आता युपीआय लाइट (UPI LITE) सेवेचा फायदा ग्राहक  घेऊ शकतात, जे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (NPCI) कमी पैशाच्या व्यवहारांसाठी खास तयार करण्यात आले आहे. यासह पेटीएम ही पहिली कंपनी ठरली आहे ज्यांनी युपीआय लाइट सर्विसला आपल्या प्लॅटफॉमवर आणले आहे. यानंतर फोन पे (phone pe) आणि स्लाईस (slice) या कंपन्या देखील ही सेवा सुरु करु शकतात. या सेवे अंतर्गत ग्राहक कमी रक्कमेचा व्यवहार अनेक वेळा करु शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)