No Charges For Multiple SIMs: एका फोनमध्ये 2 सिम कार्ड वापरण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही; TRAI ने फेटाळून लावल्या सर्व अफवा

अनेक माध्यमांनी हे अहवाल दिले होते. या बातमीमुळे लोकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे.

Representative Image

No Charges For Multiple SIMs: नुकतेच सोशल मीडियावर काही अहवाल व्हायरल होत होते, ज्यामध्ये दावा केला जात होता की, लवकरच ट्राय अनेक सिम असणाऱ्या लोकांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात करू शकते. अनेक माध्यमांनी हे अहवाल दिले होते. या बातमीमुळे लोकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे. पण, ही बाब पूर्णपणे निराधार आहे. ट्रायने स्पष्टपणे सांगितले आहे की, एकाधिक सिम असण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. अनेक लोक त्यांच्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड वापरत असतात. मात्र यातील एक सिम निष्क्रिय मोडमध्ये ठेवल्यास, तुम्हाला अशा सिम कार्डवर शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते, अशा आशयाचे हे अहवाल होते.

आता हे अहवाल एक अफवा असल्याचे समोर आले असून, या अफवा पसरवणाऱ्यांना केवळ जनतेची दिशाभूल करायची आहे. अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी फक्त ट्रायच्या अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून रहा, असे ट्रायने सांगितले आहे. (हेही वाचा: Phone Number Fee, Penalty for Inactive SIM Card: एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल तर भरावे लागू शकते शुल्क; TRAI चा नवा प्रस्ताव, जाणून घ्या सविस्तर)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)