Mumbai Police 'Pink WhatsApp' Warning: मुंबई पोलिसांचा Android युजर्ससाठी Red Alert; 'पिंक वॉट्सअ‍ॅप' वरून फसवणूक करणार्‍या लिंक पासून दूर राहण्याचे आवाहन

व्हॉट्सॲप पिंक Android वापरकर्त्यांसाठी मुंबई पोलिसांनी रेड अलर्ट जारी करत अनोळख्या लिंक वर क्लिक करून सायबर फसवणूक करून न घेण्याचं आवाहन केले आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

सध्या सोशल मीडीयामध्ये एक स्पॅम लिंक शेअर करून Android युजर्सची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार मुंबई पोलीस नागरिकांना 'Pink WhatsApp'  नावाच्या नवीन फसवणुकीबद्दल सतर्क करत आहेत. अ‍ॅडव्हायझरीनुसार, ‘अतिरिक्त वैशिष्ट्यांसह नवीन पिंक लूक व्हॉट्सअ‍ॅप’ च्या लिंक झपाट्याने शेअर होत आहेत. यामध्ये एका सॉफ्टवेअरद्वारे युजर्सचा मोबाइल हॅक होऊ शकतो. “फसवणूक करणारे भाबड्या युजर्सना सायबर फसवणूक करण्यासाठी त्यांच्या सापळ्यात अडकवण्यासाठी विविध प्रकारच्या नवीन युक्त्या आणि मार्ग शोधून काढतात. युजर्सनी अशा प्रकारच्या फसवणुकीबद्दल जागरूक, सतर्क आणि सावध राहणे आणि डिजिटल जगात सुरक्षित आणि सुरक्षित राहणे हे आहे,” आवाहनात म्हटले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)