Microsoft 365 Down: मायक्रोसॉफ्ट 365 डाउन; भारतासह जगभरातील अनेक युजर्सची तक्रार
कंपनी सध्या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.
मायक्रोसॉफ्ट आउटलुकचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे लाखो युजर्सना समस्यांना सामोरे जावे लागले आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुक लाखो कंपन्या त्यांचे कार्यक्षम कार्य सुनिश्चित करण्यासाठी वापरतात. आता आउटलुकचे सर्व्हर डाऊन झाल्याने सोशल मीडियावर यूजर्स यावर कमेंट करत आहेत. मायक्रोसॉफ्टने ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही वेबवर आउटलुक अॅक्सेस करण्याच्या समस्येची चौकशी करत आहोत.याबाबतचे अधिक तपशील तुम्ही Admin Center EX571516 या ठिकाणी पाहू शकता.’
त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘समस्येचे मूळ कारण ओळखण्याच्या प्रयत्नात आम्ही आमच्या नेटवर्किंग सिस्टम आणि अलीकडील अपडेट्सचे पुनरावलोकन करत आहोत.’ कंपनी सध्या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे. (हेही वाचा: ब्रिटिश एअरवेजवर सायबर हल्ला; कर्मचार्यांची नावे, आडनाव, जन्मतारीख, बँकिंग तपशीलांसह वैयक्तिक माहिती उघड)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)