British Airways Data Theft: ब्रिटिश एअरवेजवर सायबर हल्ला; कर्मचार्यांची नावे, आडनाव, जन्मतारीख, बँकिंग तपशीलांसह वैयक्तिक माहिती उघड
सायबर हल्ल्यात कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीशी तडजोड केली गेली आहे. पेरोल प्रदाता झेलिसच्या हॅकमुळे कर्मचार्यांची नावे, आडनाव, जन्मतारीख तसेच संभाव्य बँकिंग तपशीलांसह त्यांची वैयक्तिक माहिती उघड झाली,
ब्रिटिश एअरवेजमधून सायबर हल्ल्याचे मोठे प्रकरण समोर येत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती चोरीला गेली आहे. ब्रिटीश एअरवेजने आपल्या सुमारे 35,000 कर्मचार्यांना याबाबत माहिती दिली आहे. झेलिस (Zellis) या वेतन पुरवठादारावर हा हल्ला झाला आहे. ब्रिटिश एअरवेज कंपनी झेलिसचे ग्राहक आहे. एअरलाइनसाठी हा सायबर हल्ला मोठा धक्का मानला जात आहे. सायबर हल्ल्यात कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीशी तडजोड केली गेली आहे. पेरोल प्रदाता झेलिसच्या हॅकमुळे कर्मचार्यांची नावे, आडनाव, जन्मतारीख तसेच संभाव्य बँकिंग तपशीलांसह त्यांची वैयक्तिक माहिती उघड झाली, असे ब्रिटिश एअरवेजवर प्रवक्त्याने सांगितले. MOVEit या फाईल ट्रान्स्फर सॉफ्टवेअरमध्ये घुसून चोरांनी हा हल्ला केला आहे. हजारो कंपन्यांना याचा फटका बसल्याचे समजते. झेलिसने सोमवारी पुष्टी केली की, त्यांच्या आठ क्लायंटना याचा फटका बसला आहे. (हेही वाचा: Artificial Intelligence Kill Jobs: 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस'मुळे यूएसमधील 4000 कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या)
BA's UK staff exposed to global data theft spree https://t.co/8RQUI3d2iv
— Sky News (@SkyNews) June 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 08:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

