फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी Meta आता Twitter सोबत स्पर्धा करण्याची तयारीत, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर करत आहे काम
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा "P92" कोडनेम असलेल्या टेक्स्टिंग अॅपवर काम करत आहे आणि अधिकृत निवेदनात याची पुष्टी करण्यात आली आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा (Meta) आता ट्विटरशी (Twitter) स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. अॅक्टिव्हिटीपब प्रोटोकॉलवर काम करणार्या टेक्स्ट-आधारित अॅपच्या स्वरूपात मेटा ट्विटर स्पर्धकावर काम करत आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा "P92" कोडनेम असलेल्या टेक्स्टिंग अॅपवर काम करत आहे आणि अधिकृत निवेदनात याची पुष्टी करण्यात आली आहे. मेटा प्रवक्त्याने सांगितले की, "मजकूर पाठवण्याव्यतिरिक्त, नवीन प्लॅटफॉर्ममध्ये अनेक Twitter सारखी वैशिष्ट्ये असतील. पोस्टमध्ये रीशेअर (रीट्विट्ससारखे), फोटो, व्हिडिओ आणि वेरिफिकेशन बॅज देखील असतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)