Vodafone Layoffs: दूरसंचार कंपनी व्होडाफोन 11 हजार लोकांना कामावरुन काढणार
सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहे
ब्रिटीश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने (Vodafone) आज पुढील तीन वर्षांत 11,000 नोकर्या आपल्या कंपनीतून कमी करणार (Layoffs) असल्याचे जाहीर केले. व्होडाफोनच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्गेरिटा डेला व्हॅले एक संस्था शोधत आहे जे व्हाडोफोनचे काम आउटसोर्सने करतील. यामुळे कंपनीतील अनेक विभागातील काम कमी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. तसेच सध्या कंपनी आर्थिक समस्येसोबत झुंजत असून लवकरच वितरण व्यवस्था चांगली करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले.
पाहा ट्विट -
BREAKING: Vodafone to cut 11,000 jobs
— The Spectator Index (@spectatorindex) May 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 16, 2023 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

