GDP: डिजिटल कौशल्य असणारे भारतीय जीडीपीमध्ये देत आहे भरीव योगदान

भारतातील प्रगत डिजिटल कामगारांना अधिक फायदा होत आहे. प्रगत डिजिटल कौशल्ये वापरणारे 91 टक्के कामगार हे कामाच्या मोबदल्याबद्दल समाधानी दिसून आले

Digital Worker Pixabay

क्लाउड आर्किटेक्चर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसह आधुनिक डिजिटल कौशल्ये असणारे भारतातील कामगार हे भारताच्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) अंदाजे USD 507.9 अब्ज (रु. 10.9 ट्रिलियन) योगदान देतात असे मांडणारे नवीन संशोधन बुधवारी प्रकाशित करण्यात आले आहे.

अहवालात असे दिसून आले आहे की भारतातील प्रगत डिजिटल कामगारांना अधिक फायदा होत आहे. प्रगत डिजिटल कौशल्ये वापरणारे 91 टक्के कामगार हे कामाच्या मोबदल्याबद्दल समाधानी दिसून आले तर त्या तुलनेत मध्यवर्ती कौशल्ये असलेले कामगार हे 74 टक्के कामगार आणि मूलभूत डिजिटल कौशल्ये असलेले 70 टक्के कामगार हे मोबदल्याबाबत समाधानी दिसून आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now