Google Reinstates Indian Apps: गुगलची Play Store वर भारतीय ॲप्स पुनर्संचयित करण्यास सहमती; केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर निघाला तोडगा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गुगलने आपल्या प्ले स्टोअरमध्ये भारतीय ॲप्स पुन्हा स्थापित करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, पेमेंटच्या वादग्रस्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्टार्टअपसोबत परस्पर करारावर पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचेही म्हटले आहे.

Google Reinstates Indian Apps: गुगलची Play Store वर भारतीय ॲप्स पुनर्संचयित करण्यास सहमती; केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर निघाला तोडगा
Google Play Store | Representational image (Photo Credits: pixabay)

Google Reinstates Indian Apps: दिग्गज टेक कंपनी गुगलने मंगळवारी (5 मार्च) सांगितले की, ते भारतीय इंटरनेट कंपन्यांचे ॲप्स तात्पुरते पुनर्संचयित करत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज माहिती दिली की, गुगलने प्ले स्टोअरवरून काढून टाकलेले भारतीय ॲप्स पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गुगलने आपल्या प्ले स्टोअरमध्ये भारतीय ॲप्स पुन्हा स्थापित करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, पेमेंटच्या वादग्रस्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्टार्टअपसोबत परस्पर करारावर पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचेही म्हटले आहे. गेल्या आठवड्यात गुगलने Matrimony.com, Naukri.com, Shaadi.com या प्रमुख भारतीय डिजिटल कंपन्यांचे सुमारे डझनभर ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते. गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘सहकाराच्या भावनेने, आम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या डेव्हलपर्सचे ॲप्स तात्पुरते पुनर्संचयित करत आहोत.’ (हेही वाचा: Chakshu Portal: सायबर क्राईम मध्ये स्पॅम फोन, SMS, WhatsApp द्वारा फसवणूक करणार्‍यांवर चाप बसवण्यासाठी सरकारकडून नवं चक्षू पोर्टल)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2024 10:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).