Five Planet Alignment: दुर्मिळ घटना! आकाशात एकत्र आले बुध, शुक्र, गुरु, मंगळ आणि युरेनस असे पाच ग्रह (Watch Video)
ग्रहांची ही स्थिती एखाद्या मोत्यांच्या माळेच्या आकारात दिसली.
मंगळवारी, 28 मार्चला सूर्यास्तानंतर अंधार गडद होत असतानाच, आपल्या सौरमंडळातील पाच ग्रह एकमेकांच्या जवळ आल्याचा अद्भुत योगायोग घडला. आज बुध, शुक्र, गुरु, मंगळ आणि युरेनस हे पाच ग्रह एका रेषेत आले होते. ही खगोलीय घटना शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाची होती. ग्रहांची ही स्थिती एखाद्या मोत्यांच्या माळेच्या आकारात दिसली. आज अनेकांनी या कॅमेरा अथवा फोनच्या सहाय्याने ही घटना पाहिली. सर्वात विशेष म्हणजे यूरेनस पृथ्वीवरून दिसत नाही मात्र या ग्रहाचेही दर्शन झाले. तज्ज्ञांनुसार या अद्भुत घटनेला प्लॅनेट परेड किंवा प्लेनेट्स एलाइनमेंट म्हटले जाते. या खगोलीय घटनेनंतर आता 11 एप्रिल 2023 रोजी बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनस एकत्र दिसणार आहेत.
पहा या दुर्मिळ घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)