Changes in Twitter: आता भारतीय सरकारी खाती, कंपन्या, सार्वजनिक व्यक्तींच्या हँडलवर दिसू लागले 'Official' लेबल
नवीन बदलानंतर, अशी Official लेबले अधिकृत सरकार, कंपन्या, व्यावसायिक भागीदार, प्रमुख मीडिया आउटलेट्स, प्रकाशक आणि काही इतर सार्वजनिक व्यक्तींच्या खात्यांवर दिसतील.
एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यापासून व्यासपिठाबाबत अनेक नवे बदल सुरु आहेत. ब्लू टिकसाठी पैसे आकारण्यात येणार असल्याच्या माहितीनंतर आता, सर्व ट्विटर वापरकर्त्यांना ट्विटर वापरण्यासाठी देखील पैसे मोजावे लागतील असे काही अहवालांमध्ये म्हटले आहे. अशात ट्विटरमध्ये अधिकृतपणे काही बदल दिसणे सुरू झाले आहेत. व्यासपीठावर जे हँडल्स अधिकृत आहेत, त्यांच्या खाली ‘Official’ असे लेबल दिले जात आहे. अशी Official लेबले अधिकृत सरकार, कंपन्या, व्यावसायिक भागीदार, प्रमुख मीडिया आउटलेट्स, प्रकाशक आणि काही इतर सार्वजनिक व्यक्तींच्या खात्यांवर दिसतील. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन लाँच झाल्यावर लेबलिंग सुरू होईल. मात्र भारतामध्ये सरकारी खाती, कंपन्या, सार्वजनिक व्यक्तींच्या हँडलवर Official लेबल दिसू लागले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह, राहुल गांधी ममता बॅनर्जी यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही 'अधिकृत' लेबल दिसत आहे.
Not all previously verified accounts will get the “Official” label and the label is not available for purchase. Accounts that will receive it include government accounts, commercial companies, business partners, major media outlets, publishers and some public figures.
— Esther Crawford ✨ (@esthercrawford) November 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2022 10:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

