BYJU'S Aakash to Launch IPO: बायजू'आकाश एज्युकेशन'चा IPO पुढच्या वर्षी बाजारात आणणार
आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसचा IPO 2024 च्या मध्यात येऊ शकतो. कंपनीने सोमवारी ही घोषणा केली.
भारतातील अग्रगण्य एज्युकेशन टेक स्टार्टअप कंपनी Byju's 2024 च्या मध्यापर्यंत कंपनी आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसचा IPO 2024 च्या मध्यात येऊ शकतो. कंपनीने सोमवारी ही घोषणा केली. कंपनीने आपल्या निवेदनात जाहीर केले की आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) चा महसूल 2023-23 या आर्थिक वर्षात ₹900 कोटी EBITDA (ऑपरेटिंग नफा) सह ₹4,000 कोटी असल्याचा अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी एप्रिल 2021 मध्ये, Byju ने $950 दशलक्ष किंवा 7100 कोटी रुपयांना आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस विकत घेतले. तेव्हापासून आकाश एज्युकेशनच्या नफ्यात 3 पट वाढ झाली आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)